Saturday, March 28, 2020

उत्तम रोगप्रतिकारशक्ती

 आजारा विरोध लढण्यासाठी आम्हाला गरज असते उत्तम रोगप्रतिकारशक्ती ची आणि रोग प्रतिकार शक्ती ही  आमच्या राहणीमानावर आणि विचारसरणीवर अवलंबून असते. 
 आताच्या परिस्थितीमध्ये कोरोनाव्हायरस विरोध लढण्यासाठी आम्हाला आमची रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवायची आहे.
 रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी  सर्वप्रथम मन शांत असणे गरजेचे आहे. आणि मन शांत ठेवण्यासाठी नेगेटिव  विचारापासून आपण दूर राहिले पाहिजे.  न्यूज चैनल वर तसेच व्हाट्सअप वर कोरोनाव्हायरस संदर्भातील बातम्या बघणे टाळा. रोज किती लोक मरत आहेत हे देखील बघणे टाळा.  यापासून तुमच्या डोक्यात भीती, काळजी, चिंता, घर करून बसेल.  आणि हेच तुम्हाला कमजोर बनविण्यास मदत होईल.  याव्यतिरिक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा,  मनोरंजनात्मक नाटक सिनेमे पहा त्याच्यातून तुम्हाला विरंगुळा होईल व तुमचे मन प्रसन्न होईल,  जमत असल्यास सकारात्मक वाचन करा,  त्याचबरोबर बुद्धिबळ, कॅरम यासारखे घरी बसून  खेळ खेळू शकता.  त्याचबरोबर मनोरंजनात्मक गोष्टी वाचा व त्या तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलाबाळांना सांगा.  यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही तुमच्या मोबाईल अप्प्स मध्ये हे सर्व उपलब्ध आहे.  तुम्हाला लिहिण्यात रस असेल तर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून लिहू शकता, ब्लॉग लिहू शकता.  तुम्हाला फोटो एडिटिंग ची आवड असेल तर मोबाईलच्या माध्यमातून  सुंदर निसर्गचे फोटो  एडिटिंग करून  स्वतःचे व इतरांचे मनोरंजन करू शकता. 
 - रोग  प्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी चांगला सकस आहार घ्या जेवणात विटामिन सी चे प्रमाण वाढवा म्हणजे लिंबू , चिंच, संत्री, आवळा यासारखे पदार्थ खावे. 
- पुरेशी झोप घ्या पण शक्य करून दिवसा झोपणे टाळा. 
-एखादा छंद जोपासा तो तुम्हाला वेळ घालविण्यास मदत होईल जसे की गार्डनिंग किंवा  क्राफ्ट  मेकिंग, पेंटिंग,  इत्यादी